Breaking News

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिवांची भेट

मुंबई ः प्रतिनिधी

न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 21) राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत या वेळी उपस्थित होते. न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी, टीम मॅकलँडो, मेलीसा ली, न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या सचिव नताली मूर यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. या वेळी महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव शिवदर्शन साठे उपस्थित होते. प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करून कुंटे यांनी महाराष्ट्राची कृषी, अर्थव्यवस्था, उद्योग आदींविषयी संक्षिप्त माहिती दिली. देशामध्ये वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योगात राज्य देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधान मंडळाची रचना, सभागृहे, कामकाज पद्धती, केंद्र-राज्य संबंध, राज्य शासनाच्या प्रशासनाची रचना, कररचना आदींविषयी माहिती कुंटे आणि भागवत यांनी दिली. ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये राज्य चांगल्या प्रकारे काम करीत आहे. न्यूझीलंडबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासह विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी या भेटीमुळे मदत होईल, अशी आशा  कुंटे यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, न्यूझीलंड देश उद्योग तसेच डेअरी क्षेत्रात अग्रेसर असून दर्जेदार उच्चशिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे न्यूझीलंडच्या खासदारांनी सांगितले. त्यांनी तेथील संसदीय व्यवस्थेची, प्रशासनाची माहिती देऊन न्यूझीलंडला भेट द्यावी, असे सांगितले. या वेळी कुंटे आणि न्यूझीलंडच्या खासदारांनी परस्परांना भेटीनिमित्त स्मृतिचिन्ह दिले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply