मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील शहीद 105 हुतात्म्यांना गुरुवारी (दि. 21) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही या वेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी मंत्रालय, महापालिका, पोलीस, नौदलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.