Breaking News

पोलादपूर नगरपंचायतीसाठी 71.09 टक्के मतदान

पोलादपूर : प्रतिनिधी

पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागात मंगळवारी (दि. 21) निवडणूक घेण्यात आली. तेथे एकूण 71.09 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. दरम्यान, माजी सभापती दिलीप भागवत यांच्यासह माजी नगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीनंतर मतमोजणी होणार आहे.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये एकूण 17 प्रभाग आहेत. त्यापैकी 13 प्रभागांमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात आले. तेथे 1731 पुरुष आणि 1915 महिला मिळून  एकूण 3646 मतदार होते. त्यापैकी एक हजार 272 पुरुष आणि एक हजार 320 महिला मिळून एकूण दोन हजार 592 मतदारांनी मतदान केले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 …

Leave a Reply