Breaking News

वेश्याव्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई, नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : बातमीदार

पनवेल शहरातील शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, तसेच बसस्थानकाबाहेर वेश्याव्यवसाय करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पनवेल पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी गुरुवारी (ता. 21) या महिलांची धरपकड केली. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पनवेल शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक त्याचबरोबर पनवेल बसस्थानाक परिसरात ठिकठिकाणी खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू होता. वेश्याव्यवसायाला याच परिसरातील लॉज चालकांकडून आश्रय दिला जातो. यामुळे त्यांचाही धंदा तेजीत सुरू आहे. या महिला आर्थिक व्यवहार करून ग्राहकांना परिसरातील लॉजवर घेऊन जातात. असे प्रकार सध्या पनवेलबरोबरच इतर ठिकाणी पाहायला मिळत आहे, मात्र या महिलांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने या महिलांवर कारवाई करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी गुरुवारी शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, बस स्थानकाबाहेर फिरून वेश्याव्यवसाय करणार्‍या सहा महिलांची धरपकड केली. कारवाई केलेल्या सहा महिलांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव हे करीत आहेत. पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील वेश्याव्यवसाय करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी यासंदर्भातील निवेदन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना नुकतेच दिले होते. या वेळी स्नेहल खरे, सपना पाटील, नीता मंजुळे, चंद्रकांत मंजुळे आदी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply