Breaking News

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची फुटपाथ दुरुस्तीची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेल सेक्टर 15 मधील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि गटारावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे.

नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रेल्वे स्टेशन समोरील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. याशिवाय तेथील गटारावरील झाकणे तुटलेली आहेत, तर काही झाकणे गायब आहेत. या ठिकाणी रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने  चालायला जागा नसते. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिक या फुटपाथवरून जात असतात. सायंकाळी अनेक वेळा त्या ठिकाणी काळोख असल्याने गटारात पाय अडकून पडतात. रोज तीन-चार जण त्यामध्ये पडत असतात.

प्रभाग 17 चे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्याकडे अनेकांनी याबाबत तक्रार केली. त्यामुळे त्यांनी सिडकोकडे हा फुटपाथ त्वरित दुरुस्त करावा आणि गटारावरील झाकणे लावावीत, अशी लेखी मागणी केली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply