Breaking News

युवा उद्योजकांनी कठोर मेहनतीने व्यवसाय वाढवावा- विक्रांत पाटील

पनवेल ः वार्ताहर

तरुणाईने व्यवसायात कठोर मेहनतीची तयारी ठेवावी. त्याचबरोबर व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपला उद्योग व्यवसाय वाढवावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यावसायिक व महिला बचत गट यांच्यासाठी उपयुक्त अशा एनयूएलएम सीएलसी अ‍ॅप माहितीसाठी व उद्योजकता विकास मार्गदर्शन कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपमहापौर पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला नवउद्योजक, महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी नवनवीन उद्योगांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनीही मार्गदर्शन केले. यशस्वी दोन उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी उपस्थित युवावर्गाला व्यवसायवृद्धीसाठी शासनाच्या योजनांचा कसा वापर करून घ्यावा याबाबत माहिती दिली.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply