Tuesday , February 7 2023

हिंदुस्थान पेट्रोलियमची 26 सुरक्षारक्षकांवर कारवाई; प्रकल्पबाधित कामगारांना न्याय देणार भाजप नेते सुनील गोगटे यांचे आश्वासन

कर्जत : बातमीदार

पाइपलाइनची रखवाली करणार्‍या 26 सुरक्षारक्षकांना  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. हे सुरक्षारक्षक प्रकल्पग्रस्त असून, गेल्या तीन वर्षोपासून काम करीत होते. त्यांना न्याय्य मिळवून देण्याचे आश्वासन भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दिले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पाइपलाइन टाकली असून, तिची सुरक्षा सांभाळण्यासाठी 26 प्रकल्पग्रस्तांची कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीचे तत्कालीन अधिकारी इंगोले यांनी त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या तीन वर्षापासून हे सुरक्षारक्षक हिंदुस्तान 24 तास पेट्रोलियम कंपनीची पाइपलाइन आणि चौक्या यांच्या सुरक्षेचे काम करत होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने अचानक या सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. या सुरक्षारक्षकांनी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांची भेट घेतली. व त्यांच्याकडे न्याय्य मिळवून देण्याची विनंती केली. गोगटे यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ट्रॉम्बे मुंबई येथे असलेल्या मुख्यालयाशी संपर्क साधून व्यवस्थापनाकडे या प्रकरणी दाद मागितली आहे.

बाधित शेतकरी असलेल्या या सुरक्षारक्षकांची  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने फसवणूक केली आहे. गेली तीन वर्षे काम करीत असताना त्यांना कमी कामावरून कमी करण्यात आले आहे. या कामगारांना न्याय्य मिळवून देण्यात येईल.

-सुनील गोगटे, कोकण संपर्क प्रमुख, भाजप किसान मोर्चा 

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply