Breaking News

‘इफ्फी’मध्ये घोडचूक

सत्यजीत रे यांच्याऐवजी दुसर्‍याचा फोटो

पणजी : वृत्तसंस्था

सध्याच्या घडीला गोव्यात सुरू असणार्‍या 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इफ्फीच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणार्‍या सत्यजीत रे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीविषयी काही महत्त्वाची माहितीसुद्धा लिहिण्यात आली होती, पण या माहितीसोबत जोडण्यात आलेला फोटो चुकीचा होता. रे यांच्याऐवजी ज्येष्ठ लेखक, कवी, दिग्दर्शक गुलजार यांचा फोटो येथे जोडण्यात आला होता. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा लगेचच संकेतस्थळावर ही चूक सुधारली गेली. इफ्फीच्या संकेतस्थळावर सत्यजीत रे यांच्या 1989मध्ये प्रदर्शित झालेल्या गनाशत्रू या चित्रपटाची माहिती दिली होती. यासोबतच दिग्दर्शकांविषयीसुद्धा काही माहिती देण्यात आली होती, मात्र रे यांच्या नावाशेजारी लावण्यात आलेला फोटो हा त्यांचा नसून गुलजार यांचा होता. एका युजरच्या ही चूक लक्षात आली ज्यानंतर सोशल मीडियावर याविषयीचा स्क्रीनशॉट शेअर करीत त्याविषयीची माहिती दिली.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply