कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच 24 व 25 जानेवारी रोजी निबंध लेखन, घोषवाक्य लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या वेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, संपर्क अधिकारी विजय चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. सी. लहुपचांग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. बी. बी. जाधव यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेविका मंजुश्री सुळे हिने केले. राष्ट्रगीत स्वयंसेविका कोमल जाधव हिने सादर केले. स्वयंसेविका स्नेहा कुंभार हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम संयोजन डॉ. बी. बी. जाधव, डॉ. भारती आरोटे व अनिता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महाविद्यालयात शासनाने कोविड-19 संबंधी घालून दिलेले सर्व नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.