Breaking News

उरणमध्ये मनसेचे इंजिन घसरले

शेकडो पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये 

जेएनपीटीचे विश्वस्त भाजप नेते महेश बालदी यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) जेएनपीटीचे विश्वस्त  भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला.

मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर, खोपटे शाखाध्यक्ष हेमंत ठाकूर, चंद्रहास ठाकूर, परेश पाटील, भूपेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील, कृष्णा म्हात्रे, बद्रिनाथ पाटील, संदीप ठाकूर, दिनेश ठाकूर, तुषार पाटील, बबन ठाकूर, राजेश ठाकूर, हितेंद्र ठाकूर, परेश ठाकूर, योगेश म्हात्रे, देवेंद्र पाटील, भगवान पाटील, जीवन मोकल, जयेश ठाकूर, सूरज ठाकूर, समाधान ठाकूर, तुळशीराम पाटील, गिलेश ठाकूर, रूपेश ठाकूर, स्नेहल पाटील, भूषण ठाकूर, ओमकार पाटील, महेश पाटील, सचिन पाटील, भावेश ठाकूर, राहुल ठाकूर, अमित म्हात्रे, विश्वजित घरत, विनय पाटील, ऋषी ठाकूर, नयन ठाकूर, करण पाटील, नयन पाटील, आकाश पाटील, करण म्हात्रे, चेतन ठाकूर, विश्वास ठाकूर, प्रतिक ठाकूर, सचिन ठाकूर, मधुकर ठाकूर, दर्शन घरत, राजेश पाटील, अमित घरत, मनसे महिला शाखाध्यक्षा विशाखा प्रशांत ठाकूर, माजी महिला तालुका अध्यक्षा कलावती विश्वजित घरत, भावना परेश ठाकूर, दिप्ती महेश पाटील, विनंती घरत, मेघा ठाकूर, जागृती ठाकूर, निकिता ठाकूर, प्रियंका ठाकूर, प्रतीक्षा पाटील, रोशनी घरत, सचिन ठाकूर, जागृती म्हात्रे, मालती पाटील, प्रितम ठाकूर, प्राजक्ता ठाकूर, संदेश ठाकूर आदी खोपटे येथील मनसैनिकांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजप नेते महेश बालदी, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी उरण पूर्व विभाग उपाध्यक्ष शशी पाटील, हेमंत म्हात्रे, विश्वास पाटील, प्रदीप ठाकूर, कुलदीप नाईक, कृष्णा पाटील, किरण म्हात्रे, अविनाश ठाकूर, जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply