Breaking News

‘भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ’, खारघरमध्ये संविधान सन्मान रॅली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ असून, त्या आधारे भारताला पुर्नवैभव मिळेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील विचारवंत क्रांती खेम्मा यांनी केले. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या शुभारंभ सोहळ्यात त्या बोलत होत्या.

क्रांती खेम्मा पुढे म्हणाल्या की, भारतीय संविधानामध्ये समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी तरतूद केलेली आहे. या संविधानामुळेच देशातील नागरिकांना खासकरून कमकुवत वर्गांना विकासाच्या प्रक्रियेत विशेष संधी मिळाली आहे. सरकारने संविधान जागृतीसाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना संविधान जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत दिलेले निर्देश  योग्यच आहेत. त्यानुसार या संस्थेद्वारे पालकांसाठी संविधान पाठशाळा सुरू केल्याबद्दल सत्याग्रह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. डोंगरगावकर यांचे खेम्मा यांनी कौतुक केले.

या रॅलीमध्ये विभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाजंत्री विद्यार्थी, संविधान हाती घेतलेल्या विद्यार्थिनी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखातील मुलांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. भारतीय संविधानाचा विजय असो, या घोषणेने विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. उत्सव चौक ते सेक्टर 19मधील सत्याग्रह मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. संविधान सन्मान रॅलीत सिद्धार्थ मल्टिपर्पज रेसिडेन्शल हायस्कूल, डॉ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा, अजेंठा इंटरनॅशनल स्कूल, सत्याग्रह कॉलेज, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, डॉ. जी. के.डोंगरगावकर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोेठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply