Breaking News

कर्जतमध्ये रानडुकरांचा उच्छाद, बेकरे गावात 50 एकरवरील भातपिकाचे नुकसान

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील जंगलाला लागून असलेल्या बेकरे गावात रानडुकरे मुक्तपणे संचार करीत असून, रात्रीच्या वेळी भातशेतीचे नुकसान करीत आहेत. आतापर्यंत 13 शेतकर्‍यांच्या एकूण 50 एकर जमिनीवरील भातपीक डुकरांनी तुडवून टाकले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

बेकरे या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गावाला जंगलाचा वेढा आहे. गेल्या काही वर्षांत या भागात जंगली प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्थानिक सांगतात. अलीकडे येथे रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. ही डुकरे शेतातील भातपिकाचे नुकसान करीत आहेत. केवळ भातपीकच नव्हे; तर शेतात व परसबागेत लावलेली कंदमुळेही डुकरे जमीन उकरून बाहेर काढून खाऊन टाकतात, तर झाडाची फळेदेखील शेतकर्‍यांना मिळत नाहीत. त्यामुळे आधीच दुष्काळामुळे हवालदिल झालेला शेतकरीवर्ग पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply