Breaking News

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणार, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आश्वासन

पनवेल : वार्ताहर

प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले. प्रहार संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रलंबित मागण्या मांडल्या, तसेच दिव्यांगांच्या जुन्या स्टॉलचा मुद्दा उपस्थित करून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 2 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण व 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनी आत्मदहन करू, असे सांगितले. यावर दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू व त्यांना आंदोलन करावे लागू नये यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिले. त्याचप्रमाणे आयुक्त गणेश देशमुख यांनीही या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. याबद्दल प्रहार अंपग क्रांती संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल आणि पदाधिकारी व सदस्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply