Breaking News

अंबा नदीपुलाजवळ झाड कोसळले; वाहतूक ठप्प

पाली ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळामुळे पाली-वाकण राज्य महामार्गावर अंबा नदीपुलाजवळ बुधवारी (दि. 3) रस्त्यावर एक झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने याची ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या सूचना दिल्या. हे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने बहुतांश रस्ता व्यापला गेला होता. सोसाट्याचा वारा व पावसामुळे हे झाड बाजूला करणे किंवा काढणे लगेच शक्य झाले नाही. रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply