नगरसेवक राजू सोनी यांचे लाभले विशेष सहकार्य
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कच्छ युवक संघ पनवेल जायंट ग्रुप ऑफ पनवेल व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. जैन स्थानिक कापड बाजार पनवेल येथे झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक राजू सोनी यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबीरास नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबीरामध्ये रक्तदानासोबतच प्रिन्स अंगदान जागृती अभियानांतर्गत अॅारगन डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले. यावेळी कच्छ युवक संघ पनवेलचे ब्लड डोनेशन कनव्हेनर राजेश जोशी, ऑरगन डोनेशन कनव्हेनर गिता ठक्कर,डॉक्टर शुभंकर आगलावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.