Breaking News

सीकेटी हायस्कूलमध्ये रक्तदान शिबिर

पनवेलमधील नागरिकांचा सहभाग; एड्स प्रतिबंधक दिनाचे औचित्य

पनवेल ः  रामप्रहर वृत्त

नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट तसेच  नवीन पनवेल उपासना केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने रविवार 1 डिसेंबर रोजी सीकेटी हायस्कुल, पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक पालिका तसेच सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये बाराही महिने रक्त तुटवडा दिसून येतो, अशातच सुटयांचा मोसम सुरु झाल्यामुळे रक्तसंकलन व रक्ताची उपल्बधता करून देण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हा उपक्रम करण्यात आला. या रक्तदान शिबीरात 88 नागरिकांनी रक्तदान केले व याचे संकलन तेरणा ब्लड बँकमध्ये पाठविण्यात आले.

आपल्या देशात 130 कोटीहुन अधिक लोकसंख्या असूनही केवळ 0.7 % नागरिक रक्तदान करतात त्यामुळे रक्त पुरवठ्याच्या आवश्यकतेनुसार 40 ते 50 टक्के रक्ताची कमी भासत असते. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे. रस्त्यावर होणार्‍या अपघातामध्ये वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे 50 ते 60 टक्के अपघातग्रस्त नागरिक हॉस्पिटलमध्ये मृत पावतात. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही त्यामुळे खाजगी संस्था व हॉस्पिटल यांनी रक्तदानाची चळवळ अधिक घट्ट केली पाहिजे असे आवाहन  असे  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.

डिसेंबर महिना हा सुट्ट्यांचा महिना असला तरी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जर आपल्या विभागात रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असेल तर आम्ही सदैव तयार आहोत अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे देण्यात आली. तसेच रक्तदान केलेल्या 88 नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply