Breaking News

पनवेलमध्ये सडक सुरक्षा रॅली

पनवेल ः बातमीदार

शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देश्याने सडक सुरक्षा रॅली काढली.

या प्रसंगी सडक सुरक्षा रॅलीला संबोधित करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले म्हणाल्या की, आपले महाविद्यालय हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असते व सडक सुरक्षा रॅली काढून जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी बहुमोलाचे काम करणार आहोत. या रॅलीमुळे नक्कीच समाजामध्ये चांगला संदेश जाऊन समाज सडक सुरक्षे बाबत जागृत होईल.

ही सुरक्षा रॅली शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीला ट्रॅफिक पोलिसांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. रॅलीमध्ये छात्राध्यापकांनी विविध घोषणा, वाहतुकीच्या नियमाचे फलक दर्शवून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. रमेश भोसले, डॉ. नीलिमा अरविंद मोरे, डॉ. सुविद्या सरवणकर, प्रा.संजीवनी पैठणकर प्राध्यापक मंडळी तर छात्राध्यापक स्मिता पाटील, कुल प्रमुख दर्शना पाटील, लीडर्स, परकाळे, मंदार लेले, आनत्या शिंगाडा, सना शेख, अंकिता वाघमारे, राहुल पवार तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे सर्व छात्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेऊन रॅली यशस्वी केली.

सदर रॅलीचा कार्यक्रम इंद्रायणी कूल 3 तर्फे राबविण्यात आला. या रॅलीचे मार्गदर्शक डॉ.रमेश भोसले सर होते. रॅलीत सहभागी झालेल्या छात्राध्यापकांचा उत्साह हा वाखाणण्या सारखा होता.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply