Breaking News

गव्हाण विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षेत सुयश

पनवेल ः प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एनएमएमएस परीक्षेसाठी एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्राची कोळी, भार्गवी घरत, आकाश गुंजाळकर, प्रतिकेश मुरकुटे, सिद्धी घरत, अश्विनी रायभोळे, पल्लवी मोकल, सानिया अन्सारी, शुभम अलदार आणि जयेश कोळी हे 10 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. रायगड विभागातील सर्वांत मोठे यश विद्यालयाने संपादित केले आहे. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन भगतसाहेब, स्कूल कमिटी सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी या सर्वांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षक व विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पी. आर. काकडे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. एल. चौरे, वर्तक मॅडम या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, अरुणशेठ भगत, स्कूल कमिटी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. डी. भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर (आजीव सदस्य) पी. ए. कोळी, अटल टिंकरिंग प्रमुख आर. एस.भोईर व विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply