Breaking News

‘सीकेटी’च्या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळ आणि छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनिअर कॉलेज वावंजे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सीकेटी विद्यालयातील इयत्ता दहावी शिकणार्‍या उषा कांबळे आणि अवधूत घरत या दोन विद्यार्थ्यांनी लाय फाय प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे या प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी गटात ‘सीकेटीच्या अथर्व अमित पाटील याने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर निबंध स्पर्धेत समृद्धी तानाजी जाधव हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे,  संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण,  पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply