Breaking News

खोपोली भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजकपदी अक्षय शणमुगम यांची निवड

खोपोली : प्रतिनिधी

युवा नेते अक्षय शणमुगम यांची खोपोली भाजपच्या दक्षिण भारतीय सेलच्या संयोजक पदी निवड करण्यात आली. त्यांना जिल्हा महिला आघाडी प्रमुख अश्विनी पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या हस्ते नियूक्तीपत्रक देण्यात आले.

या वेळी शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, जिल्हा कामगार सेलचे सह संयोजक सुर्यकांत देशमुख, जिल्हा दक्षिण भारतीय सेल सदस्य श्रिजीतजी, शणमुगम आदी उपस्थित होते. शणमुगम यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. खोपोली शहरात पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने अक्षय शणमुगम भरीव काम करतील, असा विश्वास या वेळी अश्विनी पाटील व इंदरमल खंडेलवाल यांनी व्यक्त केला.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply