Tuesday , February 7 2023

लाच मागणार्या सिडको अधिकार्यासह खाजगी एजंटला घेतले ताब्यात

पनवेल ः वार्ताहर

तक्रारदाराच्या नावावर रुम ट्रान्सफर करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी सिडको नोडल ऑफिस येथे स्वीकारणार्‍या खाजगी एजंट रवींद्र छाजेड (54, रा. खांदा वसाहत) याला सापळा रचून नवी मुंबई अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतल आहे.  संबंधित रक्कम सिडकोचे अधिकारी सागर तापडीया (47 रा.खारघर) यांच्यासाठी घेतल्याने त्यांच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या नावावर रुम ट्रान्सफर करण्यासाठी ते सिडको कार्यालयात गेले असता त्यांच्याकडे 50 हजाराची मागणी करण्यात आली.  यासाठी खाजगी एजंट छाजेड याने रक्कम सिडको नोडल ऑफिस येथे स्वीकारली. त्याचवेळी त्या ठिकाणी सापळा रचलेले अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो नवीमुंबईचे पोलीस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून छाजेड याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनंतर सिडको अधिकारी सागर तापडीया यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले.

नागरिकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारासंबंधी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालय दूरध्वनी 022-27833344, टोल फ्री क्र. 1064, मोबाईल क्र. 9870486699 यांच्याशी संपर्क साधावा.

-धनाजी जळक, पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply