Monday , February 6 2023

मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी फरार

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील सुडकोळी येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून आरोपी मुख्याध्यापक फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुडकोळी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी अल्पवयीन विद्यार्थिनीस  तिच्या मैत्रिणींसमोर अश्लील शब्द वापरून त्यांना लज्जीत केले तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित विद्यार्थिनीने आईवडिलांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीची बदनामी होईल या भीतीने तिचे आईवडील सुरुवातीस शांत राहिले, मात्र या घटनेची चर्चा सुडकोळीमध्ये होऊ लागली. या मुख्याध्यापकाला धडा शिकविणे गरजेचे असल्याचे मत अन्य विद्यार्थ्यांचे पालक व्यक्त करू लागले. शेवटी मंगळवारी (दि. 3) सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलींची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. दरम्यान, सदर घटनेपासून मुख्याध्यापक हायस्कूलमध्ये आलेच नाहीत. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांविरोधात भादंवि कलम 354 (अ), 294सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण व 2012चे कलम 3 (क)9(फ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply