Breaking News

रायगडात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (दि. 21) पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे सकाळी कामावर जाणारे कामगार आणि शाळेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
वरुणराजाने सकाळीच हजेरी लावली. या पावसाचा प्रामुख्याने जोर उत्तर रायगडात दिसून आला. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, अलिबाग, रोहा अशा अनेक तालुक्यांमध्ये पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे वातावरणात गारवा आला आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिकांना फटका बसत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply