पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 2) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. मंदार पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी बैठकीतील संत शिकवणीचे महत्त्व सांगितले. सरपंच विकास पाटील, ग्रामस्थ सुरेश म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सीमा पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुभाष म्हात्रे, उपाध्यक्ष खंडू म्हात्रे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, श्रीसदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.