खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथील निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहातील पोलीस महिलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी कारागृहाच्या संकुलात बुधवारी (दि. 6) एका प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात निरामय हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कॉर्पोरेट ट्रेनर तरन्नुम डोब्रियाल यांनी ’शारीरिक व मानसिक संतुलन’यावर मार्गदर्शन केले. रोजचा दिनक्रम, पेहराव, आपली देहबोली, सकारात्मक विचारसरणी तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमात 22 महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम तळोजा मुख्य जेल अधीक्षक के. एच. कुर्लेकर, पोलीस निरीक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्यातील न्यूनगंड काढणे महत्त्वाचे आहे. निसर्गाने महिलांना प्रबळ शक्ती दिली असून याचा योग्य वापर झाल्यास अनेक समस्या मुळासकट नष्ट होतील, हाच संदेश आम्ही कार्यक्रमाद्वारे दिला असून भविष्यात रायगड व नवी मुंबईतील महिला बचत गट, सरकारी-निमसरकारी संस्था व महिला महाविद्यालयांत आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती निरामय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजना थडानी यांनी दिली.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …