Breaking News

गाडीच्या डिक्कीतून 82 हजार रुपयांची चोरी

पनवेल : बातमीदार : धान्य विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या एका व्यापार्‍याच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 82 हजार रुपये लंपास केले आहेत. शहर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.रमनीकलाल लालाजी देडीया (64) यांनी दुकान बंद करून दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे 82 हजार रुपये त्यांनी चेन असलेल्या बॅगेमध्ये ठेवून ते दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी अ‍ॅक्टीव्हा स्कूटी क्रमांक एम.एच.46 व्ही 3870 या गाडीच्या डिक्कीत पैसे असलेली बॅग ठेवून ते निघाले असताना गाडीचा मागील टायर पंक्चर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील कामगार मिश्रीलाल श्यामलाल बिलारे याला बोलावून गाडी ढकलत उरण नाका येथील पनवेल टायर सर्व्हिस या दुकानात घेऊन गेले. तेथे पंक्चर काढणारा परवेझ मुमताज अहमद आलम (30) याने सदरच्या गाडीचा टायर खराब झाला असल्याचे सांगितल्याने देडिया यांनी टायर बदलण्यास सांगितले. त्यावेळी गाडीची चावी स्वीचलाच लावलेली होती. गाडीचे पंक्चर व टायर बदली करून झाल्यावर देडिया यांनी दुकानाचे मालक यांना पैसे दिले व गाडी चालू करण्यासाठी गेले असता त्यांना गाडीची चावी स्वीचला दिसून आली नाही. त्यामुळे देडिया यांनी चावीचा परिसरात शोध घेतला, परंतु गाडीची चावी मिळाली नसल्याने त्यांनी घरी फोन करून चावी मागवून घेतली. या वेळी संशय आल्याने देडिया यांनी गाडीची डिक्की खोलून पाहिली असता गाडीच्या डिक्कीत ठेवलेली पैसे असलेली बॅग त्यांना दिसून आली नाही.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply