Breaking News

पोपटराव पवार करू शकतात, आम्ही का नाही?

अलिबाग प्रेस असोसिएशनने अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ असा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. त्या निमित्ताने हिवारेबाजाराला जाता आले. हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे अध्यक्ष  पोपटराव पवार यांच्याशी गप्पा मारता आल्या. हे गाव आपण कस बदलल याची माहिती दिली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती महत्वाची आहे , ते म्हणाले ’गावातील सर्व सुधारणा या शासकीय योजनेतूनच केल्या आहेत.’ त्यांनी गावात जलसंधारण, वनीकरण, शैक्षणिक प्रकल्प, आरोग्यविषयक शेती, दुग्ध व्यवसाय तसंच इतर योजना यशस्वीपणे राबवून गावकर्यां च्या सहकार्यानं गावाचा कायापालट केला आहे. शासकीय योजना सर्व गावांसाठी असतात. माग इतर गावांमध्ये अशी प्रगती का झाली नाही.  जे पोपटराव पवारांना जमल ते आम्ही का करु शकत नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार एक छोटस गाव. जेमतेम साडेतीनशे मिलिमीटर पाऊस. पिण्याच्या पाण्याचं दुर्भीक्ष्य, जनावरांचा चारा उपलब्ध नव्हता, ना जळणासाठी लाकूड, अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. लोक दारू गाळायचे आणि विकायचे. हिवरेबाजार बदनाम गाव होतं. आज तेच  हिवरेबाजार गाव  ग्रामीण विकासाच आदर्श बनलय. देशातूनच नव्हे तर परदेशातील लोक  देखील हिवारेबाजारच्या विकासचा अभ्यास करण्यासाठी येतात. 125  देशांच्या प्रतिनिधींनी हिवरेबाजारला भेट दिली आहे. हे शक्य झाल पोपटराव पवार यांच्यामुळे.  1989 पोपटराव पवार हिवरेबाजारचे सरपंच झाले. पवारांनी पहिली ग्रामसभा 26 जानेवारी 1990 ला भरवली. सर्व लोकांना सहकार्यासाठी आवाहन केलं. त्यावेळी लोकांसमोर काही मुद्यांविषयी चर्चा केली. गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला आणि कामाला लागले.

त्यांनी प्रथम पाणी अडवा, पाणी जिरवा, मोहीम राबवून गावातील पाण्याचा प्रश्न हाताळला. लोकांना त्याचे फायदे जाणवू लागले. श्रमदान, चराईबंदी, कुर्हाजडबंदी, नशाबंदी, कुटुंबनियोजन. ही पंचसूत्री राबवली. लोकांचा विश्वास संपादन केला. मग ते पोपटरावांना सहकार्य करू लागले. शासनाकडून योजना मंजूर करून पैसे मिळवले. चराईबंदीमुळे गावातील गवताचं उत्पादन वाढलं.  कुर्हारडबंदी अमलात आल्यामुळे झाडांची संख्या वाढली. नशाबंदी केल्यामुळे लोकांची काम करण्याची क्षमता वाढली. दारूमुळे होणारे दुष्परिणाम टळले.  डोंगरावरून आलेले पाणी, चर खणून जमिनीत जिरवण्याची व्यवस्था केली आहे, वरून येणारं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले.  तलाव तयार केले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. डोंगरवर बोरवेल खोदण्यात आली  आहे, तेथे शंभर फुटावर पाणी लागल. भरपूर पाणी आहे. पाण्याचे नियमन कण्यात येते. ज्या पिकांना जास्त पाणी लागत ती पिक घेतली जात नाहीत. 31 मे नंतर देखील गावात भरपूर पाणी असते.

गावात फेरफटका मारेल तर संपूर्ण गावात स्वच्छता आहे. गावातील रस्त्यांना पदपथ आहेत. ग्रामपंचायतीची स्वतःची पाणीपुरवठा योजना आहे. गावात शाळा आहे, ती जिल्हा परिषदेची. या शाळेत प्रवश केल्यावर आपण कोणत्यातरी खाजगी शाळेत आल्याचे जाणवते. या शाळेतील विद्यार्थी थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधू शकतात. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसाठी आरसा. फणी, पावडर, साबण आहे. स्वच्छतेचे धडे शाळेतूनच दिले जातात. विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. विद्यार्थीना बचतीची सवय लागाची हा त्यामागचा हेतू.

या गावातील ग्रमास्थांना जर जातीचा दाखला काढयाचा असेल तर त्याना प्रांत कार्यालयात जावे लागत नाही. आवश्यक ती कागदपत्र ग्रामपंचयात कार्यालयात आणून द्यायची. कागदपत्र जाम झाली की प्रांत कार्यालयात कळवल जात. प्रांत गावात येतात आणि जातीचा दाखला गावातच देतात. कुणाला ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे असेल तर आरटीओ कार्यालयात जायच नाही. सर्व कागपत्र ग्रामपंचायत कार्यालयात आणायची. आरटीओ गावात येतो. गावात कॅम्प घेतो. लायसेन्स देतो. आजोबांच्या मालमत्तेवर वारसांची नावे चढवायची आहेत. तहसील कार्यालयात जायच नाही. कागदपत्र ग्रामपंचयातीत आणून द्ययाची. ग्रामपंचयात तहसिलदारांना कळवते. तहसिलदार गावात येतात दाखला देतात. ग्रामपंचायत कार्यालयात केवळ ग्रामसेवक. इतर कर्मचारी नाही. एखाद काम असल्यास शिक्षक मदत करतात.

हिवरेबाजार गावचा विकास केला तो सर्व शासकीय योजानांच्या लाभातूनच. अगदी वनविभागाच्या योजाना देखील गावाच्या विकासासाठी राबल्या. गावासाठी कोणतीही योजना मंजूर झाली की त्याची माहिती ग्रामसभेत दिली जाते. कोणती याजना आहे. त्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे. याची माहिती सर्वांना दिली जाते. त्यामुळे भांडणे होत नाहीत. काम होतात. राजकरण होत नाही. असं पोटरावांनी सांगितलं. एक ध्येय उराशी बाळगून निष्ठेने काम केल्यास यश मिळत. अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य करून दाखवता येतात. सर्वांना विश्वासात घेऊन, ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा विकास कसा करता येतो हे पोपटराव पवारांनी दाखवून  दिले आहे. पोपटरावांना जमून ते आम्हाला का नाही जमणार. जे पापटरावांनी केले ते इतरही सरपंच  करू शकतात. फक्त इच्छाशक्ती हवी.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply