रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे एका भटक्या कुत्राने चावा घेतल्याने जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नागावच्या मांद्रेकर वाडीत राहत असलेले वैभव घाडी यांची इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली मुलगी स्वरा हिच्यावर काही दिवसांपूर्वी घरासमोरील रस्त्यावर भटक्या कुत्राने हल्ला करून दंश केला होता. यात जखमी झालेल्या स्वरावर उपचार करून रेबीज लसीकरणही करण्यात आले, मात्र तिला जास्त त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, नागावमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …