Breaking News

पावसाच्या पुनरागमनामुळे रायगडात लावणीच्या कामांना वेग

अलिबाग : प्रतिनिधी

पावसाने 12 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे रखडलेली भातलावणीची कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत.  लावणीच्या कामाला आता वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली. कडक ऊन पडल्यामुळे भाताची लावणीयोग्य रोपे करपायला सुरुवात झाली. नदीनाल्यांचे पाणी आणून रोपे जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. ऐन लावणीच्या मोसमातच पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मागील तीन दिवस चांगला पाऊस पडतोय.  ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या सर्वच भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शेतात चांगले पाणी साचले. शेतकर्‍यांनी लागलीच लावणीची रखडलेली कामे सुरू केली. लावणीच्या कामांना आता वेग आला आहे. 40 टक्के लावणी झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिले, तर पुढील 10  दिवसांत लावणीची कामे आटोपतील, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात कडक उन्हामुळे वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला होता. यामुळे जीव कासावीस झाला होता. पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply