लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह

पनवेल : वार्ताहर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून, हा सप्ताह 2 नोव्हेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या सप्ताहानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अलिबाग तालुक्यातील मेडिकल असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, रिक्षा चालक-मालक संघटना, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ, पो. नि. साळे व पो. नि. बकाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्यांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ब्युरोची वेबसाईट, ई-मेल, फोन क्रमांक, टोल फ्री क्रमांक इत्यादींची माहिती असणारे स्टिकर शासकीय कार्यालयाच्या आवारात गर्दीच्या ठिकाणी लावून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येत आहे, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍याने सरकारी काम करण्यासाठी लाच मागितल्यास  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या अलिबाग कार्यालयात दूरध्वनी क्र. 02141-222331, टोल फ्री क्र. 1064, मोबा. क्र. 9594613444, 7350750850, 9284989289, ई-मेल आयडी वूीरिललीरळसरवसारळश्र.लेा येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ यांनी केले आहे. या दक्षता जनजागृती सप्ताहाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply