Sunday , February 5 2023
Breaking News

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी केले अनाथ मुलांना साहित्यवाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या माध्यमातून आईवडिलांविना वाढणार्‍या अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही खारीचा वाटा उचलत हातभार लावला. त्यामुळे सदरचा कार्यक्रम यशस्वीरीत्या सीकेटी विद्यालयात पार पडला. या वेळी बालग्राम अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचेे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply