Breaking News

नवी मुंबई भाजप पदाधिकार्यांतर्फे आमदार मंदा म्हात्रे यांचा सत्कार

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी

सीबीडी-बेलापूर से-15ए येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी सिडकोकडून सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध केला. वाशी येथे महाराष्ट्र भवन निर्माण करण्याकरिता चालू अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करून दिली; तसेच बेलापूर जलवाहतूकीच्या वॉटर टॅक्सीचे दर कमी व्हावे याकरिता तीन वर्षांसाठी टॅक्स माफ करून दिल्याबद्दल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजप महिला मोर्चा व भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला.

या वेळी भाजपा महिला अध्यक्षा दुर्गा डोख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, माजी महापौर सुषमा दंडे, उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश राय, दिलीप तिडके, जयश्री चित्रे, विकास सोरटे, कल्पना छत्रे, सुहासिनी नायडू, जयवंत तांडेल, जगन्नाथ जगताप, ए.व्ही.नायर, शशी नायर, कल्पना शिंदे, भास्कर यमगर तसेच भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, भाजप महिला मोर्चा व उत्तर भारतीय मोर्चा यांजकडून आज जो सन्मान करण्यात आला त्यामुळे यापुढील जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तसेच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्र भवन निर्मिती करण्याचा अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न होता, त्याबाबत सातत्याने मागणी केली होती.

ज्या दिवशी भूमिपूजन होईल त्या दिवशी या प्रयत्नांचे सार्थक झाले असे समजेन. शासन दरबारी केवळ पत्रव्यवहार करून चालत नाही तर त्याबाबतचा सतत पाठपुरावा करावा लागतो, ते संपूर्ण काम पूर्णत्वास होईपर्यंत त्याबाबत पाठलाग करावा लागतो. बेलापूर मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो विश्वास सार्थक करण्यासाठी मी सतत काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांत असूनही सरकारला या कामाची दखल घ्यावीशी वाटते.

नवी मुंबईतील विविध प्रकल्प उभारण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे 1000 कोटी रुपयांच्या तरतुदींची मागणी केली होती. ते प्रकल्पही लवकरच उदयास येतील. नवी मुंबईतील भाजपा महिला मोर्चा व भाजपा कार्यकर्ते या आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply