Breaking News

मोदींमुळे भारताच्या शक्तीची जगाला ओळख खासदार किरीट सोमय्या यांचे प्रशंसोद्गार

पनवेल : प्रतिनिधी

अभिनंदनची बिनशर्त सुटका पाकिस्तानला करायला लावून प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि उत्तम नेतृत्व कसे असते हे जगाला दाखवून दिले असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 6) खारघर येथे झालेल्या बुद्धिजीवी संमेलनात सांगितले.

खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सायंकाळी 6 वाजता भाजपच्या रायगड जिल्हा बुद्धिजीवी सेलतर्फे रायगड जिल्ह्यातील उच्चशिक्षितांचे बुद्धिजीवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार किरीट सोमय्या होते. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, बुद्धिजीवी सेलचे अध्यक्ष दर्शन प्रभू, श्रीनंद पटवर्धन, माजी उपमहापौर चारुशीला घरत, कल्पना राऊत, ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकचे सभापती, नगरसेवक, रायगड जिल्ह्यातील डॉक्टर, वकील आणि सनदी लेखापाल उपस्थित होते.  या वेळी खासदार किरीट सोमय्या यांनी आपण अलिबागचे जावई असतानाही जे करू शकलो नाही ते आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून दाखवले. सीएसटी-अलिबाग रेल्वेची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना करायला लावली. याबद्दल त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी काँग्रेसने नेहरुंपासून आजच्या राहुल गांधी, प्रियंकापर्यंत 50 वर्षे गरिबी हटाव घोषणा देत राहून लोकांना फसवण्याचे काम केले. त्यामुळे ते केवढे बुद्धिवादी आहेत असे उपहासाने सांगून त्यांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पाकिस्तानने अभिनंदनला पकडल्यावर विरोधक त्याला सोडवा ओरडत असताना त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळून आत्मविश्वासाने त्याला कोणत्याही अटीशिवाय सोडवून आणले. घरेलू कामगारांसाठी योजना देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करताना त्या योजनेतून 30 वर्षे सरकारला भांडवल उपलब्ध करून दिले. यामुळे ते बुद्धिजीवी असल्याचे दिसून येत असल्याचे सांगून त्यांनी या वेळी स्वच्छता अभियान व इतर योजनांमुळे कसे फायदे झाले याची माहिती दिली.  या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदीजींनी सबका साथ, सबका विकास करताना देशातील काही लोकांना आपले नुकसान झाले असे वाटले त्यांना पटवून देण्यासाठी हे बुद्धिजीवींचे संमेलन घेण्यात येत असून किरीट सोमय्या हे उच्च शिक्षित असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांचे गरीब, श्रीमंत सर्वांशी संबंध जोडलेले असल्याने ते उत्तम पद्धतीने हे पटवून देऊ शकतात, असे सांगितले.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply