कर्जत : बातमीदार
कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किरवली येथे न्यू बजरंग क्रीडा मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांना जय हनुमान मोहाली संघाचा पराभव केला.
या स्पर्धेत नेरळ येथील जाणता राजा संघाने तृतीय, तर चौथा क्रमांक वदप येथील नेताजी संघाने मिळविला. सर्वोत्कृष्ट खेळाडू वैभव मोरे याने, उत्कृष्ट चढाईपटू विकी वांजळे आणि उत्कृष्ट पकडपटू म्हणून नितीन येरुणकर यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेला तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मधुकर घारे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे, सदानंद बडेकर, पंढरीनाथ बडेकर, रत्नाकर बडेकर,
महेंद्र बडेकर, साईनाथ श्रीखंडे, विनोद बडेकर बबन गायकर, प्रभाकर बडेकर, प्रभाकर शेळके, भरत बडेकर, केतन बडेकर, विवेक पाटील, संजय बडेकर आदींनी सदिच्छा भेट दिली.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …