Breaking News

माथेरानमधील समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः बातमीदार
माथेरानकरांना तसेच येथे येणार्‍या पर्यटकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) येथे दिले. भाजपच्या वतीने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिरात ते बोलत होते.
या उपक्रमास उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष तथा नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, उद्योजक किरण ठाकरे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माथेरानमधील घरे, झोपडपट्टी कशा प्रकारे संरक्षित करता येईल, पर्यटकांना स्वस्त आणि सुखकर प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहने, तरुणांना रोजगारासाठी व्हॅली क्रॉसिंग, रेल्वेची मालवाहतूक सेवा आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
विशेष म्हणजे राजकीय भिंती बाजूला ठेवून भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, मनसे अध्यक्ष संतोष कदम यांनी उपस्थिती लावल्याबद्दल ठाकूर यांनी आभार व्यक्त केले. आमदार महेश बालदी यांनीही विचार मांडले.
नगरसेवक राजेश चौधरी, किरण चौधरी, प्रवीण सकपाळ, प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, सचिन दाभेकर, तुकाराम आखाडे, लक्ष्मण आखाडे, संतोष आखाडे तसेच भाजप शहर कार्यकारिणीने हा आरोग्यदायी उपक्रम मोफत राबविला. त्यास भाजप शहराध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष शैलेंद्र दळवी, सुभाष भोसले, सचिव संपत दरेकर, संजय भोसले, सल्लागार अरविंद शेलार, ज्येष्ठ सल्लागार हरिहर मेहता, महिला अध्यक्ष संध्या शेलार, युवा मोर्चा अध्यक्ष बाबू बर्गे यांनी सहकार्य केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply