Breaking News

कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार

लंडन : वृत्तसंस्था

 कसोटी क्रिकेटला जगविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असताना आता मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) काही अनोख्या सूचना करून कसोटी क्रिकेटचे रूप बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी घड्याळाचा वापर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंडूंचा विशिष्ट दर्जा, नोबॉलवर फ्री हिट मारण्याची संधी, असे विविध नियम आणि पद्धतींचा प्रस्ताव एमसीसीतर्फे ठेवण्यात आला आहे.

एमसीसीच्या जागतिक समितीच्या वतीने बेंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत हे प्रस्ताव ठेवण्यात आले. इंग्लंडचा माजी कप्तान माईक गॅटिंग व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा समावेश असलेल्या या समितीने हे प्रस्ताव ठेवले आहेत.

 पाच दिवसांच्या क्रिकेटमध्ये षटकांची संथ गती हे नित्याचेच असते. इतर अनेक कारणांमुळे वेळ वाया जात असतो. त्यामुळे प्रेक्षक कसोटीपासून दुरावतात असे निरीक्षण आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी उलटी मोजणी करणार्‍या घड्याळाचा अंकुश खेळाडूंवर असेल.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply