Breaking News

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणीबाणी

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.   शहरातील अनेक भागात पाणी जात नसल्याने तेथील नळ कोरडे ठाक पडले आहेत. या बाबत युवराज रेसिडेन्सीमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदनदेखील दिले आहे. 

सुमारे 36 हजार लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे 1998मध्ये नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नळपाणी योजना कार्यान्वीत केली आहे. मात्र आजच्या घडीला नेरळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या जेमतेम 17 हजाराच्या आसपास असताना शहराच्या अर्ध्या भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील 12 आदिवासी वाड्यांना पाणी जात नाही, तर दुसरीकडे अर्धे ममदापुर गाव तहानलेले आहे. या परिस्थितीमुळे महिलांवर अनेकदा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढायची वेळ आली होती.  नेरळ शहरातील युवराज रेसिडेन्सी येथेदेखील गेल्या 10 दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, तर काही वेळेला तेदेखील पाणी येत नसल्याने तेथील रहिवासी संतप्त झाले आहेत. नेरळ शहरात पाणी नाही मात्र शहराच्या बाहेर पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याने  येथील नागरिकांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील युवराज रेसिडेन्सीमध्ये 21 नोव्हेंबरपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. कधी कधी तर पाणी येतदेखील नाही. याबाबत आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला, मात्र त्याची साधी दाखल घेतली जात नाही. वेळच्यावेळी पाणीपट्टी भरुनही आम्हाला पाणीपुरवठा केला जात नाही, याउलट इतर ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून हा भेदभाव का?

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply