Breaking News

पेणमध्ये नवरात्रौत्सवाची लगबग

पेण : प्रतिनिधी

पेणमध्ये नवरात्रौत्सवाच्या पर्वाला सुरुवात होत असून नवदुर्गांच्या मनमोहक मूर्ती पेणच्या कार्यशाळांमध्ये साजशृंगाराने सजल्या आहेत. हमरापूर, कासार आळी परिसरात फेरफटका मारताना या नवदुर्गाच्या मुर्ती नागरीकांचे आकर्षण ठरत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करावा, असे सरकारतर्फे जनतेला आवाहन केले आहे. उत्सवाच्या निमित्ताने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सुचनांची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

मात्र, परंपरागत उत्सव साजरा करणारे शक्तीपीठ, मंदिरे, मठ, याबरोबरच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. त्यात हौस म्हणून घरगुती देवीची मूर्ती बसवून नवरात्र उत्सव साजरा करणारे अनेक भाविक आहेत. या वर्षी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना चार फूट उंच मूर्ती तर घरगुती उत्सव साजरे करणार्‍यांसाठी दोन फूट उंचीची मूर्ती बसवावी, असे शासनातर्फे स्पष्ट केले आहे. यानुसार, शासनाच्या सूचनांचे पालन करीत पेणच्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये नवदुर्गांच्या मनमोहक मूर्ती मूर्तिकारांनी साकारल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply