पनवेल : येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरूनाथ (संदीप) लोंढे यांना भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या 16 डिसेंबरला आपला अर्ज भरणार आहेत. रूचिता या अर्किटेक्ट असून, स्वप्नील कल्याणकर अर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रूचिता लोंढे यांनी सांगितले की, आईचे स्वप्न माझ्यामार्फत पूर्ण करायला मिळणे हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान होणार असून, 10 तारखेला मतमोजणी आहे. भाजपतर्फे रूचिता लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पनवेलच्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …