खारघर : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले.
भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
कोशिश, निर्धांर पथनाट्य, मुन्नाभाई एसएससी, स्वप्न चित्रपटाचे कथालेखन अनेक व्यवसायिक नाटक आदींचे लेखक म्हणून परिचित असलेल्या भास्कर पाटील यांनी निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे लेखन केले आहे.
या वेळी लेखक भास्कर पाटील यांच्यासह चँम्पियन्स राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रमेश मोरे, टिव्ही सिरियलचे एटीटर भक्ती मायाळू, कवियत्री गीतकार यशश्री मोरे आदी उपस्थित होते.