Breaking News

क्लास चालकाला महाडमध्ये मारहाण

महाड : प्रतिनिधी

शहरातील खाजगी क्लासचे चालक दिलीप पुरुषोत्तम कोटिया यांना विशाल खरोसे याने मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 9) दुपारी घडली. दिलीप कोटिया यांनी क्लासची फी मागितली म्हणून त्यांना विशाल खरोसे याने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. महाड शहरातील सुबोध गांगण यांच्या दुकानासमोर सोमवारी दिलीप कोटिया यांनी विशाल खरोसे याच्याकडे फीची मागणी केली. या गोष्टीचा राग आल्याने विशाल याने दिलीप कोटिया यांना मारहाण केली. यावेळी ते गांगण यांच्या दुकानासमोरील पायरीवर पडल्याने मनगटाला दुखापत झाली. याबाबत दिलीप कोटिया यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक तिडके करीत आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply