Breaking News

साईबाबांच्या पालखीचे नागोठण्यातून शिर्डीकडे प्रस्थान

नागोठणे : प्रतिनिधी

येथील श्री साई सेवक मित्रमंडळाच्या नागोठणे ते शिर्डी दरम्यानच्या साई पालखी दिंडी सोहळ्यास बुधवार (दि. 11)पासून प्रारंभ करण्यात आला असून, ही पालखी 21 डिसेंबरला शिर्डीला पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता नागोठण्यातील श्री जोगेश्वरीमाता मंदिरातून पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी गवळआळीतील राधाकृष्ण- साईबाबा मंदिरात आली. तेथे पूजाअर्चा व आरती करून पालखी साडेअकरा वाजता पाली बाजूकडे मार्गस्थ झाली. शहरात विविध ठिकाणी या पालखीचे स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात शंकर भालेकर, मच्छिंद्र साळुंखे, मनोज भोसले, विशाल खंडागळे, राकेश वाळंज, कुणाल तेरडे, सचिन वाळंज, अमित भोय, विश्वनाथ पाटील, शेखर जोगत आदी पदाधिकार्‍यांसह 100 साईभक्त सहभागी झाले आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply