Breaking News

जांभूळपाडा केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पाली : रामप्रहर वृत्त

फॅन्ड्री फाउंडेशन तर्फे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा केंद्रातील नऊ शाळांमधील सर्व गरीब, गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फँड्री फाउंडेशनच्या आशा चिमनकर, विनायक खांडेकर, लक्ष्मण पवार, सत्यवान वाघमोडे, स्वप्नील कूवर, आनंदा पाटील व इतर स्वयंसेवक तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. फँड्री फाउंडेशनकडून सन 2016 पासून या शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती राजिप पावसाळावाडी शाळेचे मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी दिली.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply