Breaking News

खोपोलीत महिलांकडून महिलांचे कौतुक

सहजसेवा फाऊंडेशनचा महिला दिन उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी

महिला दिनानिमित्ताने सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत असणार्‍या महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांनी महिलांचा केलेला गौरव मनास भावून जातो, जबाबदारीने कार्य करणार्‍या महिलांना समाजाने अधिक पुढे येण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती वैशाली जाधव यांनी केले. या वेळी महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलेस साडी भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोळंकी यांनी केले. गौरी महेश जांभळे, जयश्री राहुल कुळकर्णी व राजेश पाटील, आयुब खान, अमीर पठाण यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले होते. नगरसेवक किशोर पानसरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका अपर्णा मोरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी संगीता वानखेडे, डॉ. सरोज काळे, डॉ. निकिता कोठारी, डॉ. ऋतुजा तांडेल, नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी जयश्री धायगुडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी तसेच सहजसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी, उपक्रम प्रमुख अ‍ॅड. गौरी जांभळे, नकुल देशमुख, आयुब खान, आमिर पठाण, शकील शेख, बी. निरंजन, आकाश सताने, अमित पवार यावेळी उपस्थित होते. संगीता वानखेडे यांनी आभार मानले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply