Breaking News

पनवेलच्या विकासाला भाजपकडून गती

पनवेल : तालुक्यातील वारदोलीमध्ये अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटिकरण आणि स्माशानभुमीचे काम करण्यात येणार आहे. हे काम स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार असून, याचे भुमीपूज भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातून आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने अनके विकास कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत वारदोली गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि स्मशानभुमीचे काम स्नानिक आमदार निधीमधून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी या विकासकाम संदर्भात अधिक माहिती दिली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नान पनवेल तालुक्यात विविध विकास कामे सुरु आहे. त्याअंतर्गत डेरीवली गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण  स्थानिक आमदार नीधी मधून करण्यात येणार आहे. या कामाचे भुमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मअध्यमातून पनवेल तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरुच आहे. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यामातून विविध विकास कामे तालुक्यात सुरु झाली असून, शुक्रवारी डेरीवली गावातील अंतर्गत रस्त्याचे काम या निधीच्या माध्यामतून करण्यात येणार आहे. या कामाचे भुमीपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळ भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, डेरीवली अध्यक्ष रविंद्र शेळके, रुपेश शेळके, जयवंत शेळके, महिला मोर्चाच्या शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply