Breaking News

उरण भाजपतर्फे आज विजयी मेळावा; आमदारांचा होणार सत्कार

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुका भाजपतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य विजयी मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि. 14) संध्याकाळी 6 वाजता शहरातील पेन्शन पार्क येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळेच्या मैदानात करण्यात आले आहे. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयी हॅट्ट्रिक करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रविशेठ पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे.

या मेळाव्यास उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, कामगार नेते सुधीर घरत, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, नीळकंठ घरत, कुलदीप नाईक, प्रदीप नाखवा, माजी सरपंच जितेंद्र घरत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित राहणार आहेत. या वेळी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply