Monday , February 6 2023

‘हिल चॅलेंजर’चे हेमंतकुमार, कमुन्या नूकी विजेते

रोहे : प्रतिनिधी

स्व. डॉ. सतिश लेले यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कोकण हिल चॅलेंजर स्पर्धेच्या दुसर्‍या वर्षी हेमंतकुमार हा स्पर्धक 21 किमीच्या मुख्य हाफ मरेथॉन स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. 10.100 हे अंतर त्याने एक तास 10 मिनिटांत पार केले. इथिओपियन धावपटू मिकीयास येमोटो याने द्वितीय आणि रोनाल्ड किबीवॉट या केनियन धावपटूने तृतीय क्रमांक पटकाविला, तर 21 किमी महिला गटात कमुन्या नूकी या केनियन धावपटूने एक तास 21 मिनिटे 36 सेकंदाची वेळ नोंदवून प्रथम, तसेच सीमा वर्मा आणि मिनाझ नदाफ यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

रोहा रोटरी क्लब अध्यक्ष विक्रम जैन, सचिव सुरेंद्र निंबाळकर, खजिनदार प्रदीप चव्हाण, सदस्य स्वप्नील धनावडे, राजीव शहा,राजू पोकळे, हेमंत ठाकूर, दिनेश जैन यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी स्पर्धेच्या आयोजनात योगदान दिले. रोहा पोलिसांचे, तसेच नगरप परिषद प्रशासनाचेही स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply