Breaking News

कर्जतमध्ये मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन

कर्जत ः प्रतिनिधी

येथील पोलीस मैदानावर अनिकेत म्हात्रे याने मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमी सुरू केली असून, त्याचे उद्घाटन करण्यात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या आले.

या अ‍ॅकॅडमीतर्फे प्रोफेशनल कोचिंग, फिटनेस असेसमेंट, स्ट्रेन्थ अँड कंडिनिंग कॅम्पस, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, व्हिडीओ व अ‍ॅनॅलिसिस, स्पोर्ट्स करिअर गायडन्स आदींविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

मूळचा पेण तालुक्यात राहणार्‍या अनिकेतचे वडील पोलीस खात्यात असून, ते कर्जतमध्ये राहत होते. त्याचवेळी मुद्रे गावात कबड्डी खेळणार्‍या मुलांमध्ये अनिकेतने कबड्डीचे धडे घेतले व स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले. अ‍ॅकॅडमी सुरू केली आहे. येथील मुले जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय किंवा प्रो कबड्डी लीगमध्ये खेळावी या त्यामागचा उद्देश आहे. उद्घाटन समारंभास माजी नगराध्यक्ष राजेश लाड, पाणीपुरवठा सभापती संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, स्पोर्ट्स आहारतज्ज्ञ श्रेया आढाव, खेळाडू मंगेश खरात आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षांनी अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडू तयार होऊन ते  जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, प्रो कबड्डी लीगमध्ये खेळून कर्जतचे नाव रोशन करतील असा विश्वास व्यक्त करून या अ‍ॅकॅडमीस लागेल ती मदत करण्यास कर्जत नगर परिषद सदैव तयार असेल, असेही त्यांनी आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

Check Also

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‌‘जीवन गौरव‌’ प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तजनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, …

Leave a Reply