लखनऊ ः बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत. सावरकरांविषयी काँग्रेसने मांडलेली भूमिका शिवसेनेला मान्य नाही. तरीही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे, यावरून काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी ट्विट केले असून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे असे सांगून जर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर काँग्रेसचे सध्या सुरू असलेले राजकारण हे सर्व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आहे, तसेच काँग्रेस केवळ नाटक करतेय हे स्पष्ट होईल, असेही मायावतींनी म्हटले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …