Breaking News

रसायनी चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

मोहोपाडा : प्रतिनिधी

जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात रसायनी व चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींनी सुयश संपादन केले. या प्रशिक्षणार्थींचा पंखांना बळ कौशल्याचे यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. या वेळी पालक संस्था जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थापक अध्यक्षा डॉ. मेघा सौमय्या, कोकणे सर, विजय कोकणे आदीसह जनशिक्षण कर्मचारी उपस्थित होते. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मोहोपाडा, चांभार्ली, लोधिवली, चौक येथील प्रशिक्षणार्थींचा सन्मान करण्यात आला. यात मोहोपाडा चांभार्ली येथील अपर्णा मोरे, मनिषा देशपांडे, प्रिती गायकवाड, अंकीता भोईर, संजना गोंधळी, रिस येथील वर्षा रामटेके, शमिक जाधव, वैशाली गमरे, प्रिया कांबळे, रविता कांबळे, दिपाली जाधव, सारिका कांबळे, मिनाक्षी कांबळे, लोधिवली येथील संजय सुभाष सांगळे, सारिका संजय सांगळे, तनुजा उतेकर, संजना पवार, कविता भुईकोट, मोर्बे चौक येथील दिव्या राणे, स्वाती राणे, चौक येथील मिनाक्षी पवार, अनिता पवार, स्नेहा चौधरी, सिध्दी साळुंखे, भारती कातकरी, जना कातकरी, कविता माळी आदींचा सन्मान करण्यात आला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply